Maharashtra : “सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात पहा, मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा”

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. रविकांत टुकार यांनी सरकारला दिला होता.

मात्र आता ते थेट मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांसोबत चालले आहेत. ते यावेळी म्हणाले, सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात पहा. मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा असा इशारा त्यांनी दिला आहे.

बुलढाण्यातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हे शेतकरी अरबी समुद्रात जलसमाधी घेणार आहेत. कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

रविकांत तुपकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, या वर्षी अति पावसाने सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. उत्पादन खर्च भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. एका क्विंटलचा भाव 6 हजार रुपये आहे.

बाजारात मिळणारा भाव 5 ते साडेपाच हजार रुपये आहे. हे दर कमी होत आहेत. कापसाचे दर उतरले आहेत. अशा स्थितीत सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गेले महिनाभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण सरकार दखल घेत नाहीये, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, 6 नोव्हेंबरला आम्ही बुलढाण्यात 50 हजार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. आमचं जगणं मान्य करा, अशी हाक सरकारला दिली. सरकारला आमचे प्रेतच पहायची असतील तर ती अरबी समुद्रात पहावीत, आम्ही हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत…

सरकार निगरगठ्ठ झाले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी 50 टक्के आहे तर कापूस उत्पादक शेतकरी 18 टक्के आहे. 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचे काम सरकार करत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

रविकांत तुपकर यांनी मागण्या मेनी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार असल्याचा निर्धारच केला असल्याचे दिसत आहे. ते म्हणाले, काहीही झालं तर मागे हटणार नाही. पोलिसांनी कितीबही दबाव आला तरी आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही.

पोलिसांनी आम्हाला आंदोलन न करण्याची नोटीस दिली आहे. आमचं आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तरीही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतलेली दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe