Cng Car Fire : उन्हाळ्याच्या दिवसात सीएनजी कारच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले तर लागू शकते आग, होईल मोठा अनर्थ

Published on -

Cng Car Fire : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने ग्राहक आता सीएनजी कार खरेदी करत आहेत. या कारच्या किमतीही पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा कमी आहेत.

परंतु, हे लक्षात ठेवा की इतर कारप्रमाणेही सीएनजी कारची देखभाल घ्यावी, खास करून उन्हाळ्याच्या दिवसात सीएनजी कारकडे दुर्लक्ष करू नये. कारण तुम्ही देखभालीकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या कारला आग लागू शकते. परिणामी तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

किट बसवून घ्या

CNG ची किंमत वाढत असली तरीही CNG पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे लोक अजूनही जुन्या गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवत आहेत. जेव्हा जेव्हा सीएनजी किट बाहेरून बसवायचे असल्यास तेव्हा ते नेहमी प्रशिक्षित मेकॅनिकने बसवावे. जर तुम्ही असे केले नाही तर कार तसेच रायडरला धोका निर्माण होतो.

होतो शॉर्ट सर्किटचा धोका

कोणत्याही कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. अनेकदा लोक काही पैसे वाचवायच्या नादात अप्रशिक्षित मेकॅनिककडून त्यांच्या गाड्या दुरुस्त करून घेतात. परंतु, कार दुरुस्त होण्याऐवजी खराब होण्याचा धोका जास्त असतो. समजा त्यांच्याकडून कोणतीही वायर उघडी राहिली तर शॉर्टसर्किटचा धोका जास्त वाढतो .

असे करा सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा

उन्हाळ्याच्या दिवसात, कार मजबूत सूर्यप्रकाशापासून संरक्षित करावी. कारण अनेकवेळा गाडी दुरुस्त करून घेतल्यानंतर जास्त उष्णतेमुळे तारा एकमेकांना तशाच चिकटून राहतात आणि त्यांना शॉर्ट सर्किटचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे तुम्ही नेहमी सूर्यप्रकाशात कार पार्क करणे टाळावे. झाड, शेड किंवा झाकलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क केले तर तुमची कार सुरक्षित राहू शकते.

अपघात झाला तर बॉनेट उघडू नका

जर कधी अपघात झाला तर गाडीचे बॉनेट उघडणे टाळावे. कारण इंजिनमध्ये अनेक प्रकारचे तेल आणि अनेक प्रकारची उपकरणे असतात. जर तुम्ही बॉनेट उघडले तर तुमच्या कारमध्ये अधिक आग लागण्याचा धोका वाढतो. म्हणून गाडीला कोणत्याही कारणाने आग लागली तर त्याचे बॉनेट उघडू नये आणि सुरक्षित अंतर ठेवावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News