अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमधून तसेच वाहनधारकांमधून देखील एक संतापाची लाट पसरली जात आहे. नुकतेच जामखेड शहरांमध्ये नगर रोड तसेच बीड रोड व करमाळा रोड येथील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यांची आणि खड्डयांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावेत अन्यथा १० दिवसात खड्डे दुरुस्ती झाली नाही तर सबंधीत अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा जामखेडात भाजपच्या वतीने देण्यात आला.
यावेळी प्रशासनाचा निषेध करत भाजपच्या वतीने नगररोड वर खड्ड्यामधे वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी पं.स.सदस्य डाॅ. भगवान मुरुमकर, सलिम बागवान, युवामोर्चाचे ता.अध्यक्ष पै.शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन गडदे, उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,
शहर अध्यक्ष अभिजित राळेभात, अर्जुन म्हेत्रे, प्रविन सानप, काशिनाथ ओमासे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, जिल्हा चिटणीस महेश मासाळ, तात्याराम पोकळे, पिंटु माने यासंह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम