Sanjay Raut : “साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु, राज्यातील सरकार घालवलं नाही तर…

Ahmednagarlive24 office
Published:

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लवकरात लवकर हे सरकार घालवले नाही तर महाराष्ट्राचे ५ तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत आहे.

कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

जर लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही, तर या राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सगळं सुरु असताना मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तुकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झाले असा खोचक टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजपचे प्रवक्ते देखील चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत.

उपमुख्यमंत्री त्याचे समर्थन करत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे.

त्यामुळे हे सरकार जर लवकरात लवकर घालवले नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले. सध्या महाराष्ट्रात कमजोर आणि हतबल सरकार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe