‘पुत्र असावा तर असा’ ‘या’ अभिनेत्याने शेतात उभारलं आई-वडिलांचे स्मारक

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- चित्रपट अभिनेता भरत जाधव हा आपल्यासाठी नवीन नाही. भरत जाधव याने त्याच्या आयुष्यात खूप चांगले चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.

मराठी कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असलेला भरत जाधव हा त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच गुणी व चांगला आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्याने आई-वडिलांचे स्मारक उभारले आहे.

हे स्मारक त्याने कोल्हापूर येथील त्याच्या शेतामध्ये उभारला आहे. भरत जाधव याने केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांच्या ‘तारका’ या फेसबुक पेजवर एक पोस्ट केले आहे.

यामध्ये त्यांनी ‘पुत्र असावा तर असा’ असे म्हटले आहे. त्याचसोबत त्यांनी भरत जाधवच्या आई- वडिलांचा फोटो पोस्ट केला आहे. भरत जाधवने आई-वडिलांच्या सर्व इच्छा प्रामाणिकपणे पूर्ण केल्या आहेत.

टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या वडीलांसाठी त्याने स्वतंत्र गाडी खरेदी केली होती. तसेच आई-वडिलांना विमानातून नव्या घरी घेऊन गेला होता. भरतने आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते.

चित्रपट, नाटक, मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. भरतचे पछाडलेला, खबरदार, जत्रा असे चित्रपट अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत