IRCTC : ऑफर असावी तर अशीच! आता स्वस्तात फिरता येणार या ठिकाणी

IRCTC : IRCTC सतत नवनवीन टूर पॅकेज आणत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टूर पॅकेजची किंमत खूप कमी असते, त्यामुळे अनेकजण याचा लाभ घेतात. असेच आणखी एक टूर पॅकेज IRCTC ने आणले आहे.

ज्यामुळे तुम्हाला बँकॉकला भेट देता येईल. कमी किंमत असल्यामुळे अशी संधी हातातून जाऊ देऊ नका. जाणून घेऊयात या पॅकेजची किंमत आणि सुविधा कोणत्या आहेत?

या ठिकाणी देता येणार भेट

IRCTC ने एक भन्नाट टूर पॅकेज आणले आहे. हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आणले असून तुम्ही थायलंडच्या बँकॉक आणि पटियालाला भेट देऊ शकता.

या दिवसापासून करता येणार बुक

IRCTC ने थायलंड व्हॅलेंटाइन स्पेकेल नावाचे एक टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज 11 फेब्रुवारी 2023 रोजी कोलकाता येथून सुरू होतील. तुम्हाला कोलकाता ते थायलंड फ्लाइटची तिकिटे मिळतील.

मिळणार या सुविधा

कोलकाता ते बँकॉकचे रिटर्न इकॉनॉमी क्लासचे तिकीट उपलब्ध असणार आहे. या टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, हॉटेल आणि जेवणाचा खर्च इ. मिळेल. तसेच तुम्हाला तुमचे स्वतःचे वैयक्तिक खर्च जसे की शॉपिंग, फोन कॉल्स इत्यादी उचलावे लागतील. तसेच या टूर पॅकेजमध्ये लोकल प्रवासासाठी बससेवा उपलब्ध असेल. यासोबतच टुरिस्ट गाईडची सुविधाही उपलब्ध आहे.

इतका येणार खर्च

जर एकट्याने प्रवास केला तर तुम्हाला 54,364 रुपये, 2 व्यक्तींसाठी 48,300 रुपयेतुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी मोजावे लागतील. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइट https://irctctourism.com/ ला भेट देऊ शकता.