Business Idea : नोकरी करून वैतागला असाल तर घरबसल्या सुरु करा हा व्यवसाय, होईल मोठी कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : अनेकजण नोकरी करत आहेत तर काही जण नोकरीच्या शोधात असतात. परंतु, अनेकजण आपल्या नोकरीला वैतागलेले असतात. जर तुम्हीही तुमच्या नोकरीला वैतागला असाल तर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

विशेष म्हणजे तुम्ही हा व्यवसाय घरच्या घरी सुरु करू शकता. यामुळे तुमची कमाईही जबरदस्त होईल. तुम्ही घरबसल्या मसाला बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता.

देशात लाखो टन वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन होते. हे मसाले बनवायला सोपे असून त्याची चवही वेगवेगळी असते. जर तुम्हाला चवीची समज आणि मार्केटचे थोडेसे ज्ञान असेल तर मसाले बनवण्याचे युनिट उभारून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

गुंतवणूक किती करावी?

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालात मसाला उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करण्यात आली असून अहवालानुसार युनिट उभारण्यासाठी 3.50 लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये 300 स्क्वेअर फूट इमारतीच्या शेडसाठी 60,000 रुपये आणि उपकरणांसाठी 40,000 रुपये खर्च येणार आहे. तर स्टार्ट अपसाठी 2.50 लाख रुपये खर्च येईल.

रक्कम कशी जमा करायची

प्रत्येकाकडे इतकी रक्कम नसते. त्यामुळे जर तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.तसेच प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत किंवा मुद्रा कर्ज योजनेचीही मदत घेता येते.

इतकी होईल कमाई

अहवालानुसार वर्षाला 193 क्विंटल मसाल्यांचे उत्पादन होऊ शकते. 5400 रुपये प्रति क्विंटल दराने एका वर्षात एकूण 10.42 लाख रुपयांची विक्री होईल. सर्व खर्च वजा केला तर वर्षाला २.५४ लाख रुपयांचा नफा होईल. म्हणजे एका महिन्यात तुम्ही 21 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावू शकता.

असा वाढवा नफा

जर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरात सुरू केला तर तुमच्या नफ्यात आणखी वाढ होऊ शकते. कारण असे केल्याने खर्च कमी होईल त्यामुळे साहजिकच नफा वाढेल.

मार्केटिंग करून वाढवा विक्री

तुमचे उत्पादन पॅकिंग करत असताना पॅकेजिंग तज्ञाचा सल्ला घ्या. तसेच हे उत्पादन स्थानिक बाजारपेठेत लाँच करा. दुकानदार आणि घरच्यांशी थेट संपर्क करा. त्याची एक एक वेबसाईट तयार करून त्यात सर्व उत्पादनांचा उल्लेख करा . त्याचबरोबर सोशल मीडिया पेज देखील तयार करा. यामुळे सगळ्यांना तुमच्या उत्पादनाबद्दल माहिती होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe