कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हा पक्ष खंबीर आहे!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात शिवसेना संपणार, अशा चर्चा काहीजण घडवून आणत आहेत. मात्र, स्व. राठोड यांनी शहरामध्ये हजारो कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे.

कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सामान्यांच्या मदतीसाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नगर शहरात शिवसेना खंबीर आहे.त्यांच्या विचारानुसार व त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सर्व शिवसैनिक एकदिलाने यापुढील काळातही करत राहतील. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

शिवसेना अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी कदम यांच्यावर पुन्हा एकदा शहरप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. पक्षाच्या आदेशानुसार संभाजी कदम यांनी नगर शहरातील शिवसेनेचे बळकटीकरण,

पक्षाची संघटनात्मक बांधणी, नवीन शाखांसह जुन्या शाखांचे नूतनीकरण आदींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्तेव विभाग प्रमुखांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत. कदम यांनी यापूर्वीही स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले आहे.

त्या काळात संपूर्ण शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले होते. त्यादृष्टीनेच संभाजी कदम यांनी नव्याने संघटना बळकटीकरणासाठी पावले टाकली आहेत. याबाबत अधिक माहिती देताना संभाजी कदम यांनी सांगितले की, नगर शहरामध्येही स्व. अनिल भैय्या राठोड

यांनी मागील ३० ते ४० वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून काम करताना सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले. पंचवीस वर्षे आमदार असतानाही त्यांनी सामान्य कार्यकर्ता याच भूमिकेतून कायम सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे व उपेक्षितांना न्याय देण्याचे काम नगर शहरामध्ये केले. यापुढील काळातही त्याच पद्धतीने शिवसेना व शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe