या रस्त्याने प्रवास करत असाल तर सावधान ! लिफ्टच्या बहाण्याने महिलेकडून लोकांची लूट

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- रस्त्यावर उभे राहून ती मंजूळ स्वरात वाहनचालकांना लिफ्ट मागते. निर्जनस्थळ येताच वाहन थांबवायला सांगते आणि चालकाकडे पैशांची मागणी करते. पैसे देण्यास नकार दिला, तर आरडाओरड करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देते.

चालका जवळ असतील तेवढे पैसे घेऊन पोबारा करते. अशा प्रकरणात सराईत असलेली महिला नगर-जामखेड रस्त्यावर लोकांची लूट करत आहे. नगर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर या महिलेकडून अनेकांची लूट झाली.

तशीच घटना शुक्रवारी दुपारी नगर-जामखेड महामार्गावर चांदणी चौक ते टाकळी काझी दरम्यान घडली. नगरहून जामखेडकडे जात असलेल्या वाहन चालक चांदणी चौकात आला असता चौकात उभे असलेल्या दोन काॅलेज युवक आणि एक महिला कारमध्ये बसली.

सध्या बस बंद असल्याने त्यांना मदत करण्याच्या भावेतून वाहन चालकाने त्यांना कारमध्ये घेतले. कॉलेजचे विद्यार्थी सारोळ्यात व महिला टाकळीस उतरणार असल्याचे सांगितले. दोन युवक सारोळ्याला उतरले व महिलेने टाकळीत कार थांबवायला सांगितली.

पर्समधून पाचशे रुपये काढून तुमचे भाडे घ्या म्हणून हुज्जत घालू लागली. वाहन चालकाने पैसे घेण्यास नकार दिला.बस बंद असल्याने मी आपणास येथे सोडले.

परंतु महिला काही ऐकेना उलट कायद्याची भाषा करू लागली. मी तहसील कार्यालयात नोकरीस असून आमच्या मॅडमना बोलावून तुमच्यावर कारवाई करते, अशी धमकी देऊन तुमच्याकडे किती पैसे आहेत, ते द्या अशी मागणी करू लागली. वाहनचालकाने तीनशे रुपये असल्याचे सांगितले. तीनशे रुपये घेऊन ती महिला पसार झाली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe