Business Idea : जगभरातील अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. त्यामुळे इतर कमर्चाऱ्यांनाही आपली नोकरी जाणार की काय अशी भीती वाटत आहे. त्यामुळे काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहेत.
जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जर कॅमोमाइलची शेती केली तर फक्त आणि फक्त 6 महिन्यातच लाखो रुपये कमावू शकता. याची शेतीही करणे खूप सोपे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅमोमाइल (जादूचे फूल) खूप फायद्याचे असून यामुळे पोटाशी संबंधित आजार बरे होतात.त्याशिवाय या फुलांचा उपयोग सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे आयुर्वेद कंपनीत जादुई फुलांची मागणी जास्त असते. अनेकजण या फुलाची लागवड सुरू करतात.
किती असते उत्पादन आणि कमाई
ओसाड जमिनीवरही या फुलाचे बंपर उत्पादन मिळते. या फुलांची लागवड करून शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात. एक एकर जमिनीत 5 क्विंटल जादुई फुले येतात. तर एक हेक्टरमध्ये सुमारे 12 क्विंटल जादुई फुलांचे उत्पादन होते. त्याची किंमत सुमारे 10,000-12,000 रुपये आहे. खर्चाच्या 5-6 पट नफा मिळू शकतो. हे पीक ६ महिन्यांत तयार होते. म्हणजे शेतकरी 6 महिन्यांत लाखो रुपये कमवू शकतात.
आहेत खूप फायदे
ही फुले सुकवल्यानंतर त्याचा चहा बनवला जातो. याच्या चहाने अल्सर आणि मधुमेहासारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. कॅमोमाइल त्वचेच्या आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. जळजळ, निद्रानाश, अस्वस्थता आणि चिडचिड यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. तसेच या फुलांचा उपयोग जखमा, पुरळ त्याशिवाय पोटाचे आजार बरे करण्यासाठी करतात.