Driving Tips : कडाक्याच्या थंडीमुळे सगळीकडे दाट धुके पडले असल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी तर धुक्यांमुळे अपघात होत आहेत. दाट धुक्यात स्वतःवर नियंत्रण आणि गाडीचा वेग कमी ठेवा.
जर तुम्हाला अपघात टाळायचे असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकता आणि अपघातही होणार नाही. गाडी चालवत असताना खालील टिप्स फॉलो करा.
धुक्यात समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे तुमच्या वाहनाचा वेग कमी आणि वाहन एकाच लेनमध्ये चालवा.
लेनच्या पांढऱ्या पट्टीलक्षात घेऊन वाहन चालवावे. जर तुम्हाला गाडी चालवत असताना रस्त्यावर तुम्हाला लेन मिळत नाही. त्या ठिकाणी तुम्ही रोड मार्किंग किंवा इतर कोणत्याही वाहनाला फॉलो करून तुमचे वाहन चालवू शकता.
त्यासाठी तुम्ही स्वत: सतर्क रहा. वाहन चालवत असताना तुमचे पूर्ण लक्ष वाहनावर असावे. गाडीत बसलेल्या सहप्रवाशांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये आणि फोनवरही बोलणे टाळावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे धुक्यात हळू गाडी चालवावी. जर तुम्ही गाडी जास्त वेगाने चालवली तर अपघाताचा धोका खूप वाढत जातो.