Indian Railways : जर प्रवास लांब पल्ल्याचा असेल तर अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. कारण हा प्रवास इतर प्रवासापेक्षा आरामदायी असतो. अनेकदा काहीजणांचे सामान रेल्वेतच राहते. त्यानंतर काही प्रवासी ते सामान परत मिळवत नाहीत.
ते कंटाळा करतात आणि सामान सोडून देतात.तर काहीजणांना असे वाटते की जर एकदा सामान विसरले तर ते परत मिळत नाही. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर रेल्वेचा हा नियम एकदा वाचा. रेल्वे प्रशासन विसरलेल्या एखाद्या वस्तूचे काय करते? जाणून घेऊयात सविस्तर.
प्रवास संपल्यानंतर संपूर्ण रेल्वे काळजीपूर्वक तपासण्यात येते. दररोज रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रतिनिधीसह स्टेशन कर्मचारी संपूर्ण ट्रेनची तपासणी करत असतात.
जर त्यांना कोणत्याही प्रवाशाची कोणतीही मालमत्ता आढळून आली तर ते सामान स्टेशन मास्टरकडे जमा करतात. हरवलेल्या वस्तूची उर्वरित माहिती रजिस्टरमध्ये टाकली जाते. यात त्या वस्तूचे वजन, अंदाजे किंमत अशी माहिती नोंदवण्यात येते.
समजा जर ती व्यक्ती हरवलेल्या सामानाचा शोध घेत स्टेशनवर परत आली आणि त्या सामानाचा दावा केला तर ते सामान संबंधित व्यक्तीला परत करण्यात येते.
अनेकांना असाही प्रश्न पडतो की स्टेशन मास्तरांकडून हरवलेले सामान परत घेण्यासाठी काही शुल्क घेतले जाते? परंतु,भारतीय रेल्वे यावर कोणतेही शुल्क आकारत नाही.