अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- जर का तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुमचे आर्थिक नुकसान तसेच इतर अनेक नुकसान होऊ शकते.कर आणि गुंतवणूक तज्ञ देखील एकच बँक खाते ठेवण्याची शिफारस करतात. अनेक बँकांमध्ये खाते सुरू ठेवल्यास पहिला तोटा होतो तो मेंटेनन्सचा.
प्रत्येक बँकेचा स्वतःचा स्वतंत्र मेंटेनन्स चार्ज, डेबिट कार्ड चार्ज, एसएमएस चार्ज, सर्व्हिस चार्ज, किमान शिल्लक शुल्क असते. म्हणजेच, तुमची जितक्या जास्त बँकांमध्ये खाती, तितके जास्त आणि वेगवेगळे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. तसेच खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास बँका भारी शुल्क आकारतात.

त्यामुळे तुम्हाला प्रत्येक खात्याचा हा नियम पाळावा लागेल. तुमचे एकच बँक खाते असल्यास रिटर्न भरणे सोपे आहे. कारण तुमच्या कमाईची संपूर्ण माहिती एकाच खात्यात उपलब्ध असते. वेगवेगळी बँक खाती असल्याने ही गणती अवघड, किचकट आणि मोठी होते.
अशा परिस्थितीत कर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. सेव्हिंग खात्यात किंवा करंट खात्यात वर्षभर कोणताही व्यवहार न केल्यास ते Inactive Bank Account बनते.
दोन वर्षांपर्यंत त्या खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास, ते Dormant Account किंवा Inoperative खात्यात रूपांतरित होते. अशा बँक खात्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
खाजगी बँकांच्या खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी काही रक्कम ठेवणे गरजेचे आहे. ही शिल्लक न ठेवल्यास एक चतुर्थांश दंड म्हणजेच 750 रुपये दंड आहे.
इतर खाजगी बँकांसाठीही असेच शुल्क लागू आहे. तर म्हणून तुम्ही तुमची अनावश्यक खाती बंद करा, जेणेकरून तुम्हाला अशा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम