शरद पवार यांच्या पक्षाचा इतिहास पाहिल्यास जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड; देवेंद्र फडणवीस

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) गोठातून त्यांना प्रतिउत्तर मिळत आहे, मात्र मनसे व राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपने उडी घेतल्याचे दिसून येत आहे.

भाजपाचे (Bjp) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी ट्विट (Tweet) करून म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध होता, एका बाजुला आपण थाटामाटात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतोय, पण दुसऱ्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतो.

बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता. पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहिती आहे.

पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य आलं तरी कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे असं स्मरण करून राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी प्रयत्न केले. २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe