Indian Railways : प्रवासादरम्यान तिकीट हरवलं तर करा ‘हे’ काम, नाहीतर…

Published on -

Indian Railways : रेल्वेचे हे सर्वात स्वस्त तिकीट असते त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. हे तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळेत प्रवास करता येतो, असा खूप जणांना प्रश्न पडतो. त्यापैकी काही जणांची अशी भावना आहे की, एकदा जनरल तिकीट खरेदी केले तर दिवसभरात कधीही रेल्वेचा प्रवास करता येतो.

परंतु, हा त्यांचा गैरसमज आहे. अनेकांचे प्रवासादरम्यान तिकीट हरवते, त्यामुळे त्यांना तिकीट हरवल्यानंतर काय करावे असा प्रश्न पडतो. कारण तिकीट नसताना प्रवास केला तर दंड भरावा लागतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेऊया.

जर तुमचे तिकीट हरवले असेल तर आता तुम्ही तुमचे तिकीट मोबाईलवरूनही दाखवू शकता. परंतु, जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही तिकीट तपासनीसकडून तुमचे डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता.

तुम्हाला डुप्लिकेट तिकीट बनवायचे असेल तर तुम्हाला 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील. जर रेल्वेचे तिकीट हरवले तर तुम्हाला त्वरित तिकीट तपासकाशी संपर्क साधावा लागणार आहे.

जर तुम्ही काउंटरवरून तिकीट खरेदी केले आणि चार्ट तयार करण्यापूर्वी ते हरवले असेल तर तुम्हाला स्लीपर क्लाससाठी 50 रुपये आणि एसी क्लाससाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

चार्ट तयार केल्यानंतर हरवलेल्या तिकीटाची तक्रार केली तर तुम्हाला तिकिटाच्या 50 टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना तुम्हाला रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News