PAN Card : जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता प्रत्येक पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
याअगोदर अनेकवेळा सरकारने पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. आता लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 ही आहे. जर तुम्ही लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बाद होईल.
“आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनधारकांसाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. हे काम तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी करा. नाहीतर तुमचे 1 एप्रिल 2023 पासून पॅन निष्क्रिय होईल.”
पॅन निष्क्रिय झाले तर
आयटी रिटर्न भरण्यापासून ते रिफंड जारी करण्यापर्यंत तुम्हाला समस्या येतील. तसेच तुम्ही बँकिंग आणि इतर कामे करू शकणार नाही. हे लक्षात घ्या की सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन आवश्यक आहे.
लिंक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
- समोर आलेल्या फॉर्ममध्ये तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका. तसेच तुम्हाला आधार कार्डानुसार तुमचे नाव टाकावे लागेल.
- जर तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमची जन्मतारीख असेल, तर योग्य त्या बॉक्सवर टिक करा.
- त्यानंतर तुम्हाला व्हेरिफाई करण्यासाठी दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- सगळ्यात शेवटी तुम्हाला “लिंक आधार” बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पॅनशी आधार लिंक केल्याचा मेसेज येईल.