कर्ज हवे असेल तर ही बातमी वाचाच..

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- संकटाच्या काळात स्टेट बँक इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलासा देत व्याजदरांमध्ये कपातीची घोषणा केली आहे. आधार दरांवर (बेस रेट्स) 5 आधार अंक म्हणजेच 0.05 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय एसबीआयने मंगळवारी घेतला आहे.

तर लेंडिंग रेटमध्ये (पीएलआर) देखील 5 आधार अंकांची कपात करत 12.20 टक्के करण्यात येईल. नवे दर 15 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.

एसबीआयच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या खिश्यावर थेट प्रभाव पडणार आहे. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना आता गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्जासमवेत अनेक प्रकारच्या कर्जाचा मासिक हप्ता कमी भरावा लागणार आहे.

जुलै 2010 नंतर घेण्यात आलेली सर्व गृहकर्जे बेस रेटशी संलग्न आहेत. याप्रकरणी कॉस्ट ऑफ फंड्सची मोजणी सरासरी फंड कॉस्टच्या हिशेबाने करण्याची किंवा एमसीएलआरच्या हिशेबाने करावी याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे.

कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या अनेक ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.त्याचप्रमाणे आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने अनेक जण घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं विचार करू लागले आहेत.

त्यामुळे नवीन गृह कर्जदारांनाही घटत्या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या या क्षेत्राला यामुळे चालना मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe