PM Kisan Yojana : आपल्या देशात अनेक योजना चालविल्या जात आहेत. त्यापैकी काही योजनांमध्ये सरकारने बदल केले आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय.
लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 13व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु, तुम्ही जर काही चुका केल्या तर तुम्हाला 13 व्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही. तुमचे पैसे अडकू शकतात.
या दिवशी येईल 13वा हप्ता
सर्व शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13व्या हप्त्याची रक्कम येण्याची शक्यता आहे.
टाळा या चुका
अजूनही तुम्ही जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ती आजच करा. नाहीतर तुम्हाला 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाला संपर्क साधू शकता.
या योजनेचा पात्र नसणारे अनेकजण असल्याचे दिसून आले आहे. ते रोखण्यासाठी शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करा. त्यामुळेही पैसे अडकू शकतात. तुम्ही http://pmkisan.gov.inला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन करू शकता.