अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना लसीचे डोस घेतले असेल तरच यापुढे दारु मिळणार असल्याबाबतची माहिती औरंगबादचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहे.
आपल्या अधिकारात आपण हा निर्णय घेतला असून औरंगाबाद जिल्हा हद्दीत कोरोना लसीकरणास मिळणाऱ्या कमी प्रतिसादांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या औरंगाबाद जिल्हाधिकारी राज्यात चर्चेत असून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरण पॅटर्न गाजत असून ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असेल तर औरंगाबाद लसीकरण पॅटर्न राबवावा अशी एकंदरीत अपेक्षा आहे.
या अनुषंगाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल, गॅस, विविध खरेदी-विक्री, प्रवास, आदी ठिकाणी कोरोनाचे डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी सेवा मिळणार असल्याचं स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी हे नियम पाळले जाणार नाहीत त्या ठिकाणच्या संस्थापना वर कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील एक पेट्रोल पंप जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या माध्यमातून सील केलेला आहे .आता किरकोळ दारू खरेदी किंवा बिअर बार परमिट रूम मध्ये दारू पिण्यासाठी संबंधित ग्राहकांना कोरोनाची लस घेतली असल्याचा दाखला हा त्या परमिट रूम मध्ये अथवा किरकोळ विक्री असलेल्या वाईन शॉप मध्ये दाखवा लागणार आहे.
एकंदरीत याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथके नेमली असून त्याचबरोबर त्या-त्या मद्यविक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही तपासले जाणार असून या आदेशाचे पालन केले जात आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम