Cholesterol And High BP : काही जणांना बदलत्या जीवन शैलीमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा समावेश आहे.
तुम्हाला आता या आजारांवर नियंत्रण ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतेही औषध किंवा गोळी खाण्याची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
जवसाच्या बियांचा फायदा होतो ?
भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी दररोज जवसाचे सेवन केले पाहिजे. जवसामुळे रक्तवाहिन्यांमधील प्लेक कमी होऊन रक्तदाब नियंत्रित करता येतो.
असतात पोषक घटक
जवसाच्या बियांमध्ये जीवनसत्व बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, फायबर, तांबे, सेलेनियम आणि कॅरोटीन, तसेच अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल यांसारखे पोषक घटक आढळतात.
खराब कोलेस्टेरॉल नियंत्रणात येते
जर जवसाच्या बिया नियमित खाल्ल्या तर त्याच्या मदतीने रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करता येते, विशेषत: पेरिफेरल आर्टरी डिसीजने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे वरदानच आहे.
असा करा वापर
जर आपण दररोज एक चमचा किंवा 5 ग्रॅम जवसाच्या बिया खाल्ल्या तर ते फायद्याचे आहे. त्या भाजून खा, लापशी किंवा दह्यात मिसळून खा. जर तुम्हाला पोटॅशियमची पातळी जास्त असेल किंवा मूत्रपिंडाचा आजार असेल तर त्याचे सेवन टाळावे.