इफकोचा मोठा दावा!! नॅनो युरिया वापरल्याने उत्पन्नात एकरी 2000 रुपये वाढ; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : भारत कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भारताची अर्थव्यवस्था उंच भरारी घेणार की खाली येणार हे अवलंबून असते.

ही बाब लक्षात घेऊन भारतीय सरकार तसेच विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या उत्पादन (Farmer’s Income) वाढीसाठी प्रयत्न करत असतात.

इफकोने देखील शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी अनेक खतांची निर्मिती केली. नुकत्याच काही दिवसांपूर्वी इफकोने अर्थात इंडियन फार्मर फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (Indian Farmer Fertilizer Co-operative Limited) या कंपनीने आपले महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट नॅनो युरिया (Nano Urea) बाजारात आणले होते.

नॅनो युरिया युरिया पेक्षा अधिक प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे याशिवाय नॅनो युरिया वापरण्यासाठी तुलनेने सोपा आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे नॅनो युरिया हे लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे यामुळे याचा जमिनीवर विपरीत परिणाम होत नाही.

यामुळे मानवी आरोग्य तसेच जमिनीचे आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित राहत असते. म्हणून याचा वापर वाढवण्यासाठी शासन देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे.

आता इफकोने एक मोठा दावा केला आहे, इफकोच्या मते, नॅनो युरिया वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असून शेतकरी बांधवांना एकरी दोन हजार रुपये अधिक उत्पन्न मिळत आहे.

इफकोने नुकत्याच काही दिवसांपूर्वी याबाबत एक सर्वेक्षण घडवून आणले होते या सर्वेक्षणात नॅनो युरिया वापरल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

एवढेच नाही यामुळे जमिनीचा पोत देखील सुधारला असून मानवी आरोग्य अबाधित राहण्यास मदत झाली आहे. नॅनो युरिया शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरत असल्याने इफको नॅनो डीएपी तसेच इतर उत्पादने नॅनो स्वरूपात बाजारात उतरवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अवस्थी यांनी नमूद केले.

अवस्थी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, नॅनो युरिया वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली एवढेच नाही तर यामुळे पर्यावरणाचे रक्षण झाले जमिनीचा पोत सुधारला आणि मानवी आरोग्य देखील अबाधित राहण्यास मदत झाली.

अवस्थी यांनी सांगितले की, नॅनो युरियाचा शोध हा ऐतिहासिक असून या दशकातील एक नवा शोध आहे. निश्चितच इफकोने केलेला हा दावा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असेल. यामुळे साहजिकच आगामी काही दिवसात नॅनो युरियाचा वापर वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe