Government of India : सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक कामात बंधनकारक करण्यात आले आहे. हे एक सरकारी महत्त्वाचे कागदपत्र असून ते आता प्रत्येक भारतीयांकडे आहे. जर ही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचे आर्थिक काम पूर्ण होऊ शकणार नाही.
केवळ आर्थिक कामे नव्हे तर शाळा, महाविद्यालय किंवा इतर कामांसाठी त्याचा वापर केला जातो. अशातच तुम्हाला आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावे लागणार आहे. सरकारने याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. जर तुम्ही आता 31 मार्चपर्यंत ही कागदपत्रे लिंक केली नाही तर तुम्ही खूप मोठ्या आर्थिक संकटात येऊ शकता.

करावे लागणार पॅन कार्ड अपडेट
मागील अनेक दिवसांपासून सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची सूचना देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या सूचनेनुसार तुमचे 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. 1 एप्रिल 2023 पासून तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही.
त्यामुळे वापरकर्त्यांना खूप तोटा सहन करावा लागू शकतो. या पॅन कार्डमध्ये पॅन क्रमांकासह व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि फोटो यासारखे महत्त्वाचे तपशील असतात. पॅन कार्ड सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते एक संवेदनशील दस्तऐवज मानले जात असून ते चुकीच्या हातात पडले तर ओळख चोरी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी त्याचा गैरवापर करण्यात येऊ शकतो.
जर तुमचे पॅन निष्क्रिय झाले, तर तुम्हाला ही कामे करता येणार नाही
- तुम्हाला आता निष्क्रिय पॅन वापरून रिटर्न फाइल करता येणार नाही.
- प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया करता येणार नाही.
- प्रलंबित परतावा निष्क्रिय पॅनला जारी करता येऊ शकत नाही.
- PAN निष्क्रिय केले तर सदोष रिटर्नच्या बाबतीत प्रलंबित कार्यवाही पूर्ण करता येऊ शकत नाही.
- पॅन निष्क्रिय झाले तर जास्त दराने कर कापावा लागणार आहे.
- इतकेच नाही तर बँकेशी निगडित आणि इतर कामे करताना अडचणी येऊ शकतात.