IMD Alert : सध्या देशभरातील लोकांना उष्णेतेपासून दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून चे (Monsoon) आगमन लवकरच झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र मान्सून चे आगमन झाले असले तरी काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत आहेत. तसेच काही राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारसह पुढील काही दिवस पाऊस (Rain) सुरू राहणार आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय 20 जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने (Weather department) दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर,
वर्धा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे पाऊस पडेल. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे.
जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
मुंबई
शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मधूनमधून पाऊस पडेल. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 59 वर नोंदवला गेला आहे.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 52 नोंदवला गेला आहे.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 55 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 55 आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 82 आहे.