IMD Alert : काही दिवसांपूर्वी मान्सूनने (Monsoon) वेळेआधीच केरळमध्ये (Kerala) आगमन करत महाराष्ट्र्रात (Maharashtra) देखील प्रवेश केला आहे. तसेच आता मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने दिला आहे.
शुक्रवारीही महाराष्ट्रात पावसाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानुसार येत्या ५ ते ६ दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) तापमानातही घट नोंदवली जात आहे.
सध्या राज्यात कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
मुंबई हवामान
शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ‘समाधानकारक’ श्रेणीत हवेचा दर्जा निर्देशांक 70 वर नोंदवला गेला आहे.
पुणे हवामान
पुण्यात कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 52 नोंदवला गेला आहे.
औरंगाबाद हवामान
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 14 आहे.
नागपूर हवामान
नागपुरात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 84 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक हवामान
नाशिकमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीतील ३० आहे.