Maharashtra news : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या जवळ येऊन हुलकावणी देत असलेला मान्सून अखेर पुढील ४८ तासांत राज्याच्या बहुतांश भागात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, पुढील ४८ तासांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक आणखी काही भाग, तामीळनाडूचा उरलेला भाग, दक्षिण आंध्रप्रदेशचा काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

त्यापुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल राहणार आहे.असे असले तरी अरबी समुद्रात ३१ मे रोजी ज्या ठिकाणी मान्सून थांबला होता, त्याच ठिकाणी तो ९ जून रोजी आहे.
सर्वसाधारणपणे १० जूना मान्सून अर्धा महाराष्ट्र व्यापत असतो. यावेळी सुरवातीला वेगाने सुरू झालेली मान्सूनची वाट पुढे अडली गेली आहे.
ताज्या अंदाजानुसार आता थबकलेल्या मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. तोपर्यंत अवकाळी पाऊसही सुरूच राहण्याचा अंदाज आहे.