IMD Rain Alert : राज्यातील या जिल्ह्यांत परतीचा धो धो पाऊस कोसळणार ! IMDचा यलो अलर्ट जारी

Ahmednagarlive24 office
Published:

IMD Rain Alert : राज्यात पावसाने (Rain) २ दिवस उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. परतीच्या पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच येत्या २ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे.

राज्यात विजांच्या कडकडाटासह अनके भागांत पावसाची दमदार हजेरी चालू आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात (Vidarbh and Marathwada) पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे.

नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळणार (Heavy Rain) असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

या राज्यांमध्ये यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार 28 सप्टेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या काही भागात जोरदार वारे वाहतील. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र.सह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मान्सूनबाबत हवामान खात्याचे अपडेट काय आहे?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या ३-४ दिवसांत वायव्य भारतातील आणखी काही भाग आणि मध्य भारताच्या लगतच्या भागांतून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये पावसाच्या हालचालीही पाहायला मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe