अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- गेले काही दिवस शेतकऱ्यांची थकबाकी पोटी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता.
सरकारने पुढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्व वत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून

कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
तर राऊत यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत लवकरच तांत्रिक समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून एक महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात येतील असे रावत यानी सांगितले.
तर विधानसभेत एक निवेदन सादर केलं होतं. त्यात घोषणा करण्यात आली आहे. यंत्रमाग तसेच विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांना मिळणारी सबसिडी पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल विधानसभेतत्यांनी केली आहे.