अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बँकांना अधिक सुट्या असणार आहेत. यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम किंवा महत्त्वाचा व्यवहार असेल तर आठवड्यापूर्वीच पूर्ण करून घ्या.
दरम्यान या सुट्या वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील.
माहितीनुसार, डिसेंबर २०२१ च्या उरलेल्या दिवसांपैकी ८ दिवस आणि जानेवारीत १२ दिवस असतील.
बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाच्या निषेधार्थ बँक संघटनांनी येत्या आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
डिसेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी
१६ डिसेंबर – बँक युनियन संप
१७ डिसेंबर – बँक युनियन संप
१८ डिसेंबर – यू सोसो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये)
१९ डिसेंबर – रविवार गोवा मुक्ती दिन
२४ डिसेंबर – ख्रिसमस पूर्वसंध्येला (मिझोरम, मेघालय मध्ये
२५ डिसेंबर – ख्रिसमस डे
३० डिसेंबर – तमू लोसार (सिक्कीम, मेघालय)
३१ डिसेंबर – नवीन वर्षाची संध्याकाळ (मणिपूर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम