Best FD Rates For Senior Citizen : गुंतवणूक तर सर्वजण करत असतात. मात्र प्रत्येकाच्या गुंतवणुकीवर वेगवेगळ्या दराने व्याजदर मिळत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा फायदा अनेक जेष्ठ नागरिकांना होत आहे. जेष्ठ नागिरकांच्या गुंतवणुकीवर बँकेकडून देखील सर्वाधिक व्याजदर दिले जात आहे.
वरिष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या ५ वर्षाच्या गुंतवणुकीवर अनेक बँकांकडून सर्वाधिक व्याज दिले जात आहे. त्यामुळे बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना एक चांगला मार्ग आहे.
ज्येष्ठ नागरिकांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याचा एक चांगला मार्ग आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून नवीन वर्षात रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनके बँकांचे कर्ज महाग झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक बँका खालीलप्रमाणे
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र 5 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना FD वर 6.25% व्याज देत आहे. तसेच 3 वर्षांच्या कालावधीसाठी 6.50% आणि 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.65% व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक 5 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 6.90 टक्के दराने व्याज देत आहे. 3 वर्षांसाठी 7.25 टक्के व्याज भरताना. यासह 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7.25% व्याज देखील उपलब्ध आहे.
इंडियन बँक
ही सरकारी बँक 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.00% व्याज देत आहे. 3 वर्षांसाठी FD वर वार्षिक 6.75% व्याज भरताना. याशिवाय 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.60 टक्के व्याज उपलब्ध आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँक ज्येष्ठ ग्राहकांना 5 आणि 3 वर्षांच्या FD वर 7.00% व्याज देत आहे. याशिवाय एक वर्षाच्या कालावधीसाठी ७.२५ टक्के व्याज दिले जात आहे.
बँक ऑफ इंडिया
ही सरकारी बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर वार्षिक 6.75 टक्के दराने व्याज देत आहे. तर 3 वर्षांसाठी 7.25% आणि 1 वर्षासाठी 6.50% व्याज दिले जात आहे.