OnePlus : स्मार्टफोनप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! OnePlus च्या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये असणार ‘हे’ बदल

Ahmednagarlive24 office
Published:

OnePlus : वनप्लस आपल्या चाहत्यांना एक जबरदस्त गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लवकरच भारतीय बाजारात 5G स्मार्टफोन धुमाकूळ घालणार आहे. हा स्मार्टफोन देशात 7 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे.

कंपनीचा हा OnePlus 11 स्मार्टफोन आहे. ज्याची वापरकर्ते वाट पाहत आहे. OnePlus 11 मध्ये 100W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा तसेच मजबूत प्रोसेसर देखील कंपनीने दिला आहे. या फीचर्समुळे स्मार्टफोन चाहत्यांच्या पसंतीस उतरणार असल्याचे दिसत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

TENAA च्या लिस्टनुसार, कंपनीने फोनमध्ये 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा क्वाड HD+ AMOLED डिस्प्ले देणार असून तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तर हा स्मार्टफोन दोन प्रकारात येईल. एक म्हणजे 12GB+256GB आणि दुसरा म्हणजे 16GB+512GB. त्याशिवाय प्रोसेसर म्हणून कंपनीकडून Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात येणार आहे.

फोटोग्राफीचा विचार केला तर फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असणार आहेत. यामध्ये 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असलेला 32-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असेल. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन केवळ 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल असे लिस्टिंगमध्ये म्हटले आहे.

हा हँडसेट अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी असून ती 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याशिवाय OS बद्दल सांगायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित ColorOS 13 वर काम करेल. भारतात हा स्मार्टफोन 7 फेब्रुवारीला लॉन्च होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe