Pensioners Deadline : सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी EPFO ने त्यांच्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते.
पेन्शनधारकांनी सांगितलेल्या तारखेपर्यंत जमा करावे नाहीतर तुमची पेन्शन कायमची बंद होईल. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर EPFO ने सांगितलेल्या तारखेअगोदर प्रमाणपत्र जमा करा.
याबाबत EPFO ने ट्विट केले होते, त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, ‘EPS’95 पेन्शनधारक हे आता केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असेल.’
हेही लक्षात ठेवा
EPFO च्या ट्विटनुसार, EPS 95 अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. हे प्रमाणपत्र सबमिट केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असणार आहे हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षी जर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र 31 डिसेंबर रोजी जमा केले असेल तर या वर्षीही तुम्हाला ते त्याच तारखेला किंवा त्यापूर्वी जमा करावे लागणार आहे.
हे प्रमाणपत्र शेवटच्या सबमिशनच्या तारखेपासून केवळ 12 महिन्यांसाठी वैध असणार आहे. यापूर्वी, सर्व ईपीएस पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात डीएलसी सादर करणे आवश्यक होते. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी लांबच लांब रांगा आणि लोकांची मोठी गर्दी यामुळे पेन्शनधारकांना खूप त्रास सहन करावा लागला.
येथे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करा
- पेन्शन वितरण बँक
- कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)
- IPPB/भारतीय पोस्ट ऑफिस/पोस्टमन
- उमंग अॅप
- जवळचे EPFO कार्यालय