अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अनेकांना रेल्वेने प्रवास करणे आवडते. यातच आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर घेऊन आलो आहे. ट्रेनने प्रवास करण्याच्या नवीन गाइडलाइनबद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत. ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी रात्री झोपण्याचे नवीन नियम जाणून घ्या.
जाणून घ्या काय आहेत नवीन नियम
या नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही. आता यामुळे कोणत्याही प्रवाशाच्या झोपेचा त्रास होणार नाही.

जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले त्याचारवर कारवाई केली जाणार आहे. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची असेल.
याशिवाय लोकं रात्ररात्रभर दिवे सुरू ठेवतात. यामुळे देखील लोकांमध्ये वाद होतात. परंतु यासंदर्भात देखील रेल्वेने नियम बनवले आहे. ज्यामध्ये रात्री 10 नंतर ट्रेनमधील दिवे बंद करण्याबाबत देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु नाईट लॅम्प तुम्हाला चालू ठेवावा लागेल.