महत्वाची बातमी ! ‘या’ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. हा संप मागे घेण्यात यावा यासाठी शासन स्तरावर अद्यापही प्रयत्न सुरूच आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3 टक्के केल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन 10 डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे समजते.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या वेतनवाढीची घोषणा केली होती. मात्र, राज्यातील अनेक आगारातील एसटी कर्मचारी आणि अधिकारी संपावर ठाम आहेत.

त्यातच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नवनियुक्त आणि 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार आहे.

10 ते 20 वर्षांचे सेवा झालेल्यांचा पगार 4 हजारांनी आणि 20 वर्षांपुढील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 2500 रुपयांना वाढणार आहे.

पगारवाढीनंतरही गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे.

आतापर्यंत 8195 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, 1827 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तरी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe