अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. यामुळे अजून पाऊस किती दिवस असणार आहे ?
याबाबत सर्वानाच प्रश्न पडला आहे. मात्र राज्यातील पाऊस 9 ऑक्टोबरपासून थांबणार असून शेतकर्यांच्या हाती खरीप पिके येतील, असा दावा प्रसिद्ध हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी केला आहे.

नेवासा तालुक्यातील दिघी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने पंजाबराव डख तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल चिंधे यांना नुकताच सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना पंजाबराव डख म्हणाले, अलीकडच्या काळात प्रचंड वृक्षतोड झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले असून यामुळे पावसाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अतिवृष्टी गारपीट, मुसळधार पावसाने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
त्यासाठी जास्तीतजास्त वृक्षलागवड करून पर्यावरण समतोल राखल्यास भविष्यात शेतकर्यांना चांगले दिवस येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात. मात्र नैसर्गिक अपत्तीचा फटका फक्त शेतकर्यांना बसतो.
करोना महामारीच्या काळात देश संकटात असताना शेतकर्यांनी कसलीही भीती न बाळगता मदतीची महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून शेतकरी हाच खरा राजा आहे. त्यामुळे यापुढे फक्त शेतकर्यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













