अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटरने अव्वाच्या सव्वा बिल कोरोना पेशंटकडुन आकारल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.
यावर जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात करोना दुसऱ्या लाटेत एकीकडे सर्वसामान्य माणून मरणयातना सहन करत असतांना खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लुट करण्याचे प्रकार शहरात सुरूच होते.
राज्यशासनाने करोनाबाधितांवर उपचाराचे दर व नियम ठरवून दिले असतांनाही, रुग्णालये त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे करोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर अव्वाच्या सव्वा दर आकारणी करून कोव्हिड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणुक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या.
नुकतेच श्रीरामपूर येथील एका महिलेने देखील जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. शासनाच्या नियमापेक्षा जास्त बील आकारलेबाबत या तक्रारी होत्या.
या सर्व तक्रारी च्या अनुषंगाने नगरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. या सेंटरने लाखोंचे बिल वसूल केल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तक्रारदारांची संख्या वाढत असल्याने हे कोवीड सेंटर आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम