‘बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे, बारामतीचा शिंदे इन्स्पेक्टर तरुणीला घेऊन लॉजवर जातो’; गोपीचंद पडळकरांनी उघड केले कारनामे

Published on -

मुंबई : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानपरिषदेत पुणे जिल्ह्याच्या गुन्हयाचा (Crime) पाढाच वाचून दाखवला आहे. त्यातली त्यात त्यांनी बारामतीवर (Baramati) अधिक भर दिला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेही त्यांनी वाचून दाखवले आहेत.

गोपीचंद पडळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात (Pune District) बारामतीचा शिंदे नावाचा एक इन्स्पेक्टर एका तरुणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर गेल्यावर ती चित्रीकरण करते. ते चित्रीकरण सोशल मीडियावर सर्वत्रं व्हायरल होतं.

हे व्हायरल झाल्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी त्याची तडकाफडकी बदली करतात. हे जर प्रकरण असं असेल तर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद का केला नाही? जर त्याची चूक नव्हती तर त्याची बदली कशासाठी केली?

बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे. ही बारामतीतील कहानी आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल केला नाही. कोण त्याला पाठिशी घालत आहे? कशासाठी घालत आहे? याचा हिशोब महाराष्ट्राताील गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे असेही पडळकर म्हणाले.

तसेच पुण्यातील घटनेचाही किस्सा पडळकर यांनी सांगितला आहे. ही एकच घटना नाहीये. तर तहसीलदार ऑफिसात एक क्लर्क मुलगी टेबलवर बसली होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती आला आणि तिचं चुंबन घेऊन गेला.

ती मुलगी त्याच्या पाठी शिव्या देत धावली. पण तोपर्यंत त्याने पोबारा केला होता. अजून तो तपासात सापडला नाही. त्याच्यावर गुन्हा नोंद नाही. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. तो चोरी करायला गेला होता, असं उत्तर दिलं गेलं. ओळखपाळख नसताना हा प्रकार घडला.

पै पाव्हण्यात भांडण झाल्याने एक महिला पोलीस ठाण्यात गेली होती. पीएसआय मोहिते यांनी हे प्रकरण संपवलं. यावेळी या महिलेने बोलताना तिला एमपीएससी करायचं असल्याचं मोहितेंना सांगितलं.

मी तुला मार्गदर्शन करतो असं सांगून मोहितेंनी तिचा नंबर घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर या महिलेने एमपीएससी करण्यासाठी पुण्याला जायचं असल्याचा तगादा नवऱ्याकडे लावला.

त्यावर तुला पुण्याला घेऊन जातो, तुझी हॉस्टेलला राहण्याची व्यवस्था करतो असं नवऱ्याने सांगितलं. पण, मोहिते यांच्याशी माझी ओळख असून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे माझी राहण्याची सोय केल्याचं या महिलेने नवऱ्याला सांगितलं.

त्यानंतर ती पुण्याला गेली. दोन महिन्यानंतर तिचे फोन यायचे बंद झाल्याने तो पत्नीला भेटायला गेला. तेव्हा त्या महिलेच्या अंगावर त्या पीएसआयच्या नावाचा टॅटू होता. तेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याने मोहितेंना फोन करून तुम्ही माझा संसार का बरबाद करत आहात अशी विचारणा केली.

त्यावर मोहितेने त्यांना धमकावलं. हातपाय तोडण्याची धमकी दिली. तुझ्या बायकोच्या नावाने माझ्या कंपनीतील 10 टक्के शेअर ठेवले आहेत, असं त्याने सांगितलं. या मोहितेंची कोणती कंपनी आहे याचा शोध घेतला पाहिजे.

या मोहितेंवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्याची चौकशी झालेली नाही. त्यावर बोलण्याचं धारिष्ट्य सरकार दाखवत नाही. ही सर्व प्रकरणं पुणे ग्रामीणच्या एसपींना माहीत आहे. तरीही कारवाई होत नाही असे आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe