बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास ‘इतक्या’ कमी वेळेत होते कोरोनाची लागण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणदेखील वाढलं आहे. कोरोनाची ही दुसरी लाट भीषण आहे.कोरोना फैलावण्याचा वेगदेखील वाढला आहे. मास्क न घालता कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते.

आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण व्हायची. आता हेच प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू अतिशय वेगानं हातपाय पसरत आहे.

आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. याआधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका असायचा.

आता ही वेळ मिनिटावर आली आहे. बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू अतिशय वेगानं हातपाय पसरत आहे. आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे.

आधी परिस्थिती वेगळी होती. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी तिला कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे. दिल्लीतील सर्वाधिक कोरोना रुग्ण ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.

या वयोगटातली लोकसंख्या जास्त असल्यानं आणि ते कामासाठी बाहेर पडत असल्यानं रुग्णांमध्ये त्यांचं प्रमाण मोठे आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe