शेअर बाजार हा एक विशाल समुद्र आहे. यात भरपूर कंपन्या आहेत. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांची नावे देखील आपल्याला माहिती नसतील. अनेक लोक या शेअर बाजारात करोडपती झाले. योग्य मार्गदर्शन व योग्य अभ्यास असला की शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे.
या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीबद्दल माहिती सांगणार आहोत की ज्याने अक्षरशः करोडो रुपया कमवून दिले आहेत. म्हणजे ज्यांनी साधारण ६३ हजार रुपये साडेतीन वर्षांपूर्वी गुंतवले होते त्यांना आता एक कोटी रुपये मिळाले असतील. या कंपनीचे नाव आहे हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी. गेल्या 3.5 वर्षात या कंपनीचे शेअर्स प्रचंड वाढले आहेत.
हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेडच्या शेअर्सविषयी थोडेसे
हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे 205 कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. या कंपनीचा शेअर्स
3.5 वर्षांपूर्वी 0.84 रुपये इतका होता. हाच शेअर सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी 134.75 रुपयांच्या किमतीवर बंद झाला. म्हणजेच या शेअर्सने सुमारे 16,000 टक्क्यांनी वाढ दर्शवली आहे.
या हिशोबाने जर एखाद्याने साडेतीन वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 1.6 कोटी रुपये झाले असते. फक्त 63,000 रुपये गुंतवले असते तरी त्याचे आज 1 कोटींहून अधिक रुपये झाले असते. म्हणजे साडेतीन वर्षात या शेअर्सने करोडपती केले आहे.
हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी विषयी माहिती
या शेअर्सची कामगिरी अस्थिर आहे. हा शेअर्स कमी जास्त प्रमाणात वाढताना दिसतो. एका महिन्याचा रिटर्न पाहिला तर 13.57 टक्के नफा मिळालेला आहे. मागील 6 महिन्यांचा रिटर्न पाहिला तर या शेअर्समध्ये 16.63 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे.
एका वर्षाचा विचार केला तर या शेअर्सने 53.33 टक्के वाढ दर्शवली आहे. ही खूप छोटी कंपनी आहे. या कंपन्यांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक करणे रिस्की असते. पण रिटर्न जर पाहिले तर रिस्क घेणे योग्य ठरले असते असे वाटते कारण इतका मोठा रिटर्न मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करूनही मिळत नाही.
महत्वाचे
शेअर परफॉर्मन्सच्या आधारे जी माहिती मिळते ती आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगतो. शेअरमध्ये गुंतवणूक करणे हे रिस्की आहे. त्यामुळे कमी जोखीम असणारे शेअर्स पाहावेत व त्यात तज्ञांच्याच सल्ल्याने गुंतवणूक करावी म्हणजे तुम्हचे रिटर्न रिस्क फ्री राहतील.