अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील खेड येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या भुमीहिन गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्याकरिता खेड ग्रामपंचायत सभेत फॉरेस्ट जागेसमोर किंवा गणेशवाडी, राशिनरोड लगत रस्त्यावर मत्स्य व्यवसाय करण्यासाठी जागेत बसावे त्याकरिता ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधित विभागाची अटी शर्तीची पूर्तता करावी अश्या सूचना देखील सभेत दिल्या आहे शासनाची अटी शर्तीची पूर्तता करीत असताना
देखील मत्स्य व्यवसायिक रीतसर संबंधित विभागाची परवानगी अटी शर्ती ची पूर्तता करत ग्रामसभेने नियोजित दिलेल्या जागेत मत्स्य व्यवसाय करण्यासाठी बसले असताना जमाव करीत गावगुंडांनी त्या मत्स्य व्यवसायिकाना व्यवसाय करण्यास मज्जाव करीत उपासमारीची वेळ आणली त्यांच्यावर दमदाटी करीत अडथळा निर्माण केला त्यासंबंधित कर्जत पोलिस निरीक्षक यांना देखील कर्जत तालुका तहसीलदार यांनी लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले होते की,
दमदाटी करून जमावाने अडथळा निर्माण करणाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु सदर मत्स्य व्यवसायिक हे मागासवर्गीय व अल्पसंख्यांक असल्याने त्यांना दमदाटी करून अडथळा निर्माण करणारे अनिल काकडे व इतर सात जन यांचे गावात दहशत असल्याने प्रस्थापित सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याकारणाने त्यांच्या दबावा खाली कर्जत पोलिस निरीक्षक व तहसीलदार हे वेळ काढू पना करीत कागदोपत्री तपास चालू आहे
असे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पीडित मत्स्य व्यवसायिक यांनी व खेड येथील ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांना फोनद्वारे कळवीत त्यांची आणि महासचिव योगेश साठे,सल्लागार जिवन पारधे,संघटक फिरोज पठान यांची भेट घेत सविस्तर माहिती देत त्यांना लेखी पत्राद्वारे सहकार्य व आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब व पोलिस अधिक्षक साहेब यांची समक्ष भेट घेत सदर मत्स्य व्यवसायिक हे गरीब मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील असल्याने त्यांना उदरनिर्वाह करण्याकरिता शासनाची गायरान,फॉरेस्ट जागा ही भाडेतत्त्वावर देण्यात यावी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांन्या आपण पीडितांना न्याय मिळवून देण्याकरिता आदेश द्यावे अशी विनंती केली
यावर व्यावसायिकांना त्यांच्या उदरनिर्वाह करिता शासनाची गायरान व फॉरेस्ट जागेची अटी शर्ती नुसार जागा मिळवून देऊ व न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिलं व पोलीस प्रशासनाने या गावगुंडांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या मत्स्य व्यावसायिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी मागासवर्गीय व अल्पसंख्यांक मत्स्य व्यवसायिक आप्पासाहेब सोपान कांबळे,
शिवदास रामा अडसूळ,सत्यवान रामा शेटे,कृष्णा बापू सरतापे,भाऊसाहेब रामचंद्र जावळी,जालिंदर रामचंद्र खंडागळे,तानाजी सुभाष खंडागळे,हसन मुसा शेख,साहिल तय्यब शेख,विशाल प्रकाश सोंडे आदीसह मनोज चव्हाण, मनोज कर्डिले,विशाल साबळे,देविदास भालेराव कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम