राजकारणात पक्ष कोणताही असला तरी सत्ता सोयर्‍या-धायर्‍यांचीच असते

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांचे स्नेहबंध जुळल्याचे राज्याने बघितले आहे. आजवर एकामेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन मातब्बर घराण्यातील तिसर्‍या पिढीत रेशीमगाठीचा योग जुळून आला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील सोयर्‍या धायर्‍यांचे राजकारण हा राज्यात चर्चेचा विषय असतो. आजवर या घराण्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा दिसून आली. विधानसभा निवडणुकीत एकामेकांना पाडापाडीचे राजकारण झाले.

सहकारी साखर कारखाना चालविताना उसाचे दर जाहीर करण्यावरून आणि शेतकर्‍यांना पेमेंट करतानाही एकमेकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न झाले.

कधीकाळी एकाच पक्षात राहून पडद्याआड एकमेकांसमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न झाले. मात्र या घराण्यातील तिसरी पिढी हा संघर्ष मागे सोडून नातेसंबंधांचा नवा ‘उदय’ घडविण्याच्या मार्गावर आहे.

राजकारण कितीही टोकाला गेले तरी कौटुंबिक स्नेह जपण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पक्ष कोणताही असला तरी सत्ता सोयर्‍या-धायर्‍यांचीच असते, असे गमतीने म्हटले जाते. मात्र अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याचं समजते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe