थकीत कर प्रकरणी ‘या’ नगरपंचायतीने सहा दुकाने केली सील

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  नगरपंचायतीचा कर अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या दुकानदारांवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने आज दुकाने सीलची कारवाई करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत एकूण ६ दुकाने सील केली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान नगरपंचायतीच्या वतीने व्यवसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद होते. व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने दुकाने सीलची कारवाई थांबवावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली.

दरम्यान आजच्या या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्यावसायिकांचा वाढता रोष पाहता मुख्याधिकाऱ्यानी सावध भूमिका घेत व्यवसायिकांना चर्चेसाठी नगरपंचायतमध्ये बोलावले.

त्यानुसार व्यवसायिकांनी आपले विविध मुद्दे मांडले. त्याचा विचार करून ५० हजार रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या व्यवसायिकांनी येत्या सोमवारपर्यंत (दि.११ ऑक्टोबर) ५० टक्के रक्कम भरावी.

उर्वरित रक्कम दिवाळीनंतर भरावी, असा निर्णय घेण्यात आला. ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यवसायिकांना तीन टप्प्यात रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe