तिसगावमध्ये डॉक्टर उतरले रस्त्यावर, पोलिसांना मात्रा पडली लागू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावरील हल्ला प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करावी, जामीन मिळालेल्या आरोपींविरूद्ध पुन्हा कोर्टात जावे, या मागणीसाठी तीसगावमध्ये डॉक्टरांनी रविवारी रास्तारोको आंदोलन केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनची नगर शाखा, अहमदनगर स्त्री रोगतज्ञ संघटना, पाथर्डी तालुका डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने तिसगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पाथर्डीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. डॉ. म्हस्के यांना मारहाण केलेल्या ५ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याचा निषेध नोंदवला. त्याविरुद्ध लवकरच न्यायालयात दाद मागण्यात येईल.

तसेच उरलेल्या १३ आरोपींना लवकरात लवकर अटक करून जरब बसेल अशी कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आली. अहमदनगर स्त्री रोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बन्सी शिंदे, आयएमएचे सचिव

डॉ. सचिन वहाडणे, खजिनदार डॉ. गणेश बढे, डॉ. ज्योत्स्ना डौले, डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. सुहास घुले, डॉ. स्वाती घुले, डॉ. अशोक काळे, डॉ. प्रसाद ढुस, डॉ. सचिन रक्ताटे,

डॉ. किरण दिपक, डॉ. वैशाली किरण, डॉ. प्रदीप इंगळे, डॉ. दिपक जायभाय, डॉ बाळासाहेब देवकर, डॉ. सचिन घुले, डॉ. हर्षल चितळे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. सुप्रिया वीर यामध्ये सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe