अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात करोनाचा प्रार्दभाव होवू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात दररोज नव्याने करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
त्यातच राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे करोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यासाठी सात समन्वय अधिकारी यांची नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली आहे.
अशी असणार आहे समन्वय समिती :- या समन्वय समितीमध्ये नगर तालुक्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी, शिर्डीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्रीरामपूरसाठी उपजिल्हाधिकारी भू संपादन क्रमांक सात, संगमनेरसाठी उपजिल्हाधिकारी रोजगार हमी विभाग, पाथर्डीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, श्रीगोंदा-पारनेर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कर्जत-जामखेड जिल्हा शल्य चिकित्सक, नगर यांचा समावेश आहे
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक केलेले हे सात समन्वय अधिकारी करोनाच्या दुसर्या लाटेच्या समोर आलेल्या रुग्णांच्या दुप्पट संख्याने तालुकानिहाय कोविड केअर सेंटर,
डेलीकेटेड कोविड सेेंटर या ठिकाणी असणारे बेड, लहानमुलांसाठी आवश्यक असणारे बेड, संबंधीत तालुक्यातील ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनची स्थिती,
रुग्णालयातील एकूण बेडची संख्या, ग्रामीण रुग्णालयातील करोनाशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री, औषधांचा साठा यासह अन्य बाबींची येत्या सोमवार (दि.27) पाहणी करून अहवाल तयार करणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम