अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- श्रमिकनगरमध्ये लवकर आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर बालाजी मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
सभागृह नेते मनोज दुलम हे विकासकामांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच हि विकासात्मक कामे होत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/image-13.png)
दरम्यान महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या शुभहस्ते श्रमिक नगर येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ झाले. यावेळी सभागृह नेते मनोज दुलम, नगरसेवक महेंद्र गंधे, तायगा शिंदे, उदय कराळे,
सावेडी भाजप मंडल अध्यक्ष सतिष शिंदे, शिवराम श्रीगादी, राजू येमूल, आसाराम मोकाटे, प्रिती दळवी, निलीमा दुर्गम, वनमाला टोलपे, राधाबाई गादी, वैशाली कटकम,
मंदाबाई गायकवाड, भाग्यलक्ष्मी गड्डम उपस्थित होते. भाजपा शहरजिल्हाध्यक्ष गंधे म्हणाले की, श्रमिक नगर मधील जनता नेहमीच भाजपा पक्षाबरोबर प्रामाणिकपणे राहिली आहे.
या भागाचा विकास व्हावा. यासाठी मनोज दुलम नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|