अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक शस्त्र बनले आहे. मात्र या शस्त्राच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कोरोनाची लढाई कशी जिंकणार असा सवाल नागरिक करू लागले आहे.
यातच लसीचा होणार अल्प पुरवठ्यामुळे लसीकरण करण्यात अडचण निर्माण होत असल्याने आता नागरिक आक्रमक होऊ लागले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान आरोग्य केंद्राला लोकसंख्येच्या मानाने होणारा लसींचा पुरवठा अत्यंत कमी आहे. येथील आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा वाढवुन द्यावा,
अन्यथा 14 जुन पासून येथील तलाठी कार्यालयासमोर करोनाचे नियम पाळुन उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा टाकळीभानच्या महीला सरपंच अर्चना रणनवरे यांनी तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदनाद्वारे दिला होता.
त्यानुसार उपोषणाच्या तयारीत असलेल्या लोकसेवा विकास आघाडीच्या उपोषणकर्त्यांना वाढीव लस देण्याचे लेखी पत्र तहसिलदार प्रशांत पाटील यांनी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आलेे.
तहसिलदार पाटील यांनी उपोषणाची दखल घेवुन तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन टाकळीभानसाठी वाढीव लस देण्याचे आदेश दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम