मुसळधार पावसामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरण ‘इतके’ टक्के भरले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, कोतूळ भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. व यामुळेच मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे.

पाण्याची आवक सुरू असल्याने आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 22800 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.यामुळे मुळा धरण 88 टक्के भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरातात पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ देखील घटली होती.

पण गेल्या चार दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नदीला पाणी वाढू लागले आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने मुळा नदीचे पाणी वाढले होते.

पाऊस कायम राहिल्यास चार-पाच दिवसांत हे धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे दृष्य पहायला मिळत आहे. या पावसाचा लाभ भातपिकांना होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe