हमीभाव केंद्राकडे हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांचा वाढतोय कल; तुर, सोयाबीनचे काय आहेत दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022  Krushi news:- राज्य सरकार आणि नाफेडच्या माध्यमातून राज्यभरात कृषी केंद्रावर हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यात सरकारने ठरवून दिलेल्या ज्या त्या पिकाच्या हमीभावा नुसार माल खरेदी करून घेतला जातो.

तर हरभरा पिकासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली असून हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने शेतकरी हरभरा कमी दरात खुल्या बाजारात त्यांची विक्री करत होते.

पण आता शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात होताच खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा अधिकचा भाव मिळत

नव्हता मात्र हमीभाव केंद्रावर 4 हजार 500 पेक्षा अधिकचा हमीभाव केंद्राने दिला आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची आवक सुरु आहे.

हरभरा वगळता इतर शेतीमालाचे दर हे स्थिर आहेत.तर दोन दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात 50 रुपयांची घट झाल्यानंतर 7 हजार 250 रुपयांवर सोयाबीन स्थिरावले आहे.

तुरीची राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. मात्र हंगामाच्या सुरवातीला खुल्याबाजारात तुरीचे दर घसरले होते पण खरेदी केंद्र सुरु झाल्यापासून दर वाढले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe