IND vs ENG : विराटसेनेने भारतीयांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं ! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला धुव्वा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर ऑलआऊट झाली.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी धुव्वा उडवला आहे.

आज या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.

इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.

पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe