Ind Vs Pak Asia Cup 2022 : आशिया कप-2022 (Asia Cup 2022) शनिवारपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ (Afghanistan and Sri Lanka) पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील, हा सामना दुबईत (Dubai) होणार आहे.
मात्र सर्वांच्या नजरा या ज्या सामन्यावर आहे तर म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) . रविवारी दुबई स्टेडियमवर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार आहेत.
2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर भिडत आहेत. अशा परिस्थितीत जाणून घ्या या मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्याची महत्त्वाची माहिती.
• भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आहे?
आशिया कप 2022 मध्ये हा सामना रविवारी (28 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
• हा सामना कुठे होत आहे?
यावेळी आशिया चषक यूएईमध्ये होत असून, भारत-पाकिस्तान सामना दुबई स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंका हा आशिया कपचा अधिकृत आयोजक आहे.
• मी भारत-पाकिस्तान सामना कोठे पाहू शकतो?
आशिया चषकाचे प्रसारण स्टार नेटवर्कवर होत असल्याने स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर थेट सामना पाहायला मिळणार आहे.
• T20 मध्ये भारत-पाकिस्तानचा रेकॉर्ड काय आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 6 मध्ये भारताने, तर 2 मध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे. एक सामना बरोबरीत राहिला, तोही भारताने अखेर जिंकला.
• आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा विक्रम काय आहे?
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने 7 तर पाकिस्तानने 5 जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
• आशिया कपसाठी दोन संघ कोण आहेत?
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर.