Ind vs ZIM T20 World Cup : पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होणार खराब ? जाणून घ्या मेलबर्नमधील हवामान

Ind vs ZIM T20 World Cup : T20 World Cup मध्ये भारताचा पुढचा सामना रविवार 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा ग्रुपमधील शेवटचा सामना असणार आहे.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. मात्र आता पर्यंत या विश्वचषकातील तीन सामने मेलबर्नमध्ये रद्द झाले आहे.  उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत झिम्बाब्वेला पराभूत करावे लागले नाहीतर पुन्हा एकदा नवीन समीकरण तयार होईल.

मेलबर्न हवामान अहवाल

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना ऑस्ट्रेलियात संध्याकाळी 7 वाजल्यापासून रंगणार आहे. त्यावेळी भारतात संध्याकाळचे 1.30 वाजले असतील. Accuweather.com च्या मते, मेलबर्नमध्ये त्यावेळी पावसाची शक्यता नाही.

मैदानावर प्रचंड थंडी असणार आहे. खेळादरम्यान तापमान 16 डिग्री सेल्सियस राहू शकते. याशिवाय वाऱ्याचा वेग ताशी 11 किलोमीटर राहील. आर्द्रता 83 टक्के राहील. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. या T20 विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळला गेला. विराट कोहलीच्या नाबाद खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने जिंकला.

झिम्बाब्वेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: Rohit Sharma (Captain), KL Rahul (Vice Captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Rishabh Pant/Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, Axar Patel, Ravichandran Ashwin, Bhuvneshwar Kumar, Mohammad Shami, Arshdeep Singh.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

India: Rohit Sharma (capt), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Dinesh Karthik (wk), Axar Patel, R Ashwin, Mohammed Shami, Arshdeep Singh, Bhuvneshwar Kumar, Rishabh Pant, Deepak Hooda, Harshal Patel, Yuzvendra Chahal.

Zimbabwe: Regis Chakabwa (captain), Sean Williams, Sean Irwin, Craig Erwin, Sikandar Raza, Tendai Chatra, Luke Jongwe, Brad Evans, Wesley Madhevere, Wellington Masakadza, Tony Munyonga, Richard Ngarwa, Ryan Burle, Blessing Mujaramba, Multon Shubhan.

हे पण वाचा :- Aadhaar Card Download: नागरिकांनो ! आधार कार्डमध्ये ‘ही’ गोष्ट पटकन करा अपडेट नाहीतर ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe